पोलिस स्टेशनची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 20, 2014 22:51 IST2014-07-20T22:51:41+5:302014-07-20T22:51:41+5:30
जिल्हय़ातील आसेगाव,धनज पोलीस स्टेशनच्या बरोबरीत गुन्हय़ाचे प्रमाण शेलूबाजार चौकीला सुध्दा पोलिस स्टेशनची प्रतीक्षा आहे.

पोलिस स्टेशनची प्रतीक्षा
शेलुबाजार : जिल्हय़ातील आसेगाव,धनज पोलीस स्टेशनच्या बरोबरीत गुन्हय़ाचे प्रमाण शेलूबाजार चौकीला सुध्दा पोलिस स्टेशनची प्रतीक्षा आहेत मात्र तेथे गृह खात्याचे दुर्लक्ष असल्याने अपुर्या कर्मचार्यामुळे गुन्हय़ाचा तपास संथगतीने चालु असल्याच्या प्रचंड तक्रारी पुढे येत आहे. जवळपास २६ गावातील ५४ हजार लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतांना कर्मचार्यांची अपुरी संख्या कारणीभुत ठरत असल्याचे सत्य समोर येत आहे तेथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हय़ाच्या आकडेवारीत घट निर्माण व्हावी याकरिता पोलीस स्टेशनच्या प्रस्तावाचा लवकरात लवकर विचार होणे गरजेच झाले आहे.
मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या शेलूबाजार पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस स्टेशनमध्ये व्हावे यासाठी गतवर्षी गृह खात्याकडे प्रस्ताव गेलेला आहे परंतु त्या प्रस्तावावर अद्याप पर्यंत विचार झाला नसल्याचे दिसुन येते. त्या पोलीस चौकी हद्दीत २६ गावे असुन जवळपास ५४ हजार लोकसंख्येची गावे आहेत ऐवढया मोठय़ा प्रमाणात असलेल्या गावाचा कारभार पाहण्यासाठी पोलीस चौकीत बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत जिल्हय़ातील आसेगाव,धनज पोलीस स्टेशनच्या बरोबरीत तेथे गुन्हे घडत असतात त्या गुन्हय़ाचा तपास तात्काळ होणे गरजेचे असते परंतु कर्मचारी संख्या अत्यल्प असल्याने घडणार्या गुन्हय़ावर अंकुश घालण्यावर पोलीस कुचकामी ठरत आहे.त्या ठिकाणी २४ तास एका अधिकार्यांची ड्युटी असणे गरजेचे आहे परंतु चौकीला नियुक्ती पोलीस अधिकारी कधीच येथे कार्यरत असल्याचे दिसुन येत नाही.गुन्हय़ाचे प्रमाण पाहता महिला आरोपी असतात त्यासाठी महिला पोलीस शिपायांची नियुक्ती करण्यात आली नसल्याचे दिसुन येते.शेलूबाजार एक मोठी बाजार पेठ असुन या ठिकाणी रात्रीची गस्त असणे गरजेचे आहे परंतु अपुर्या कर्मचार्यामुळे रात्रीची गस्त होतांना आढळुन येत नाही
शेलूबाजार येथुन औरंगाबाद नागपुर दृतगती मार्ग गेल्यामुळे या हायवेवर नेहमीच अपघात तसेच इतर घटना घडत असतात घटनेच्या वेळी आपत्तगस्तांना त्वरीत मदत मिळण्यास फार विलंब लागत असते.त्यामुळे अप्रिय घटना घडल्याचे चित्र पहावयास मिळाले.त्याच बरोबर हायवे शेलूबाजार चौकातुन गेल्यामुळे नेहमीच चौक वाहतुकीच्या कोंडी अडकल्याचा प्रकार वारंवार पुढे आले परंतु त्यावर उपाय म्हणुन येथे दोन वाहतुक शिपाई कार्यरत आहे पण सदर वाहतुक शिपाई मजबुरीने कर्तव्य बजावत असल्याचे अनेक वेळा दिसुन आले चौक वाहतुकीच्या कोंडीत सापडल्या नंतर वाहतुक व्यवस्था त्वरीत सुरळीत करण्याचा प्रयत्न करित नाही अनेक वेळा वाहतुक व्यवस्थे बाबत तक्रारी होवुन सुध्दा निष्क्रीय कर्मचारी वरिष्ठांच्या कृपा दृष्टीमुळे कार्यरत आहेत कर्तव्यावर येण्याची वेळ त्यांच्या साठी दिली की काय असा सवाल उपस्थीत होते.भर चौकावरून खाजगी वाहतुकीचा नागवा नाच सुरू असतांना वरिष्ठांचा वचक या ठिकाणी नसल्याचे स्पष्ट होते.
वरिष्ठांनी शेलूबाजार येथील क्राईमच्या आकडेवारीत घट निर्माण होण्याच्या दृष्टीने कारवाई होणे महत्वाचे आहे त्याच बरोबर लोकप्रतिनिधीनी सुध्दा शेलूबाजार पोलीस स्टेशन संदर्भात गृह खात्याकडे धुळ खात पडलेल्या प्रस्तावासाठी पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे