आंतरजिल्हा बदलीची शिक्षकांना प्रतीक्षा!

By Admin | Updated: March 5, 2016 02:39 IST2016-03-05T02:39:41+5:302016-03-05T02:39:41+5:30

माहिती मागविली; ५५ जणांचे प्रस्ताव.

Waiting for interchanged teachers! | आंतरजिल्हा बदलीची शिक्षकांना प्रतीक्षा!

आंतरजिल्हा बदलीची शिक्षकांना प्रतीक्षा!

अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम)
आंतरजिल्हा बदली, पती-पत्नी एकत्रीकरणाची माहिती आठ दिवसांत सादर करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने शिक्षण विभागाला दिल्यानंतर जिल्हा परिषदेने आवश्यक ती माहिती मागविली होती. या आदेशाची आता अंमलबजावणी कधी होणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून आहे.
आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत अनेक वर्षांंपासून जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजविणार्‍या कर्मचार्‍यांसाठी ग्रामविकास विभागाचा हा निर्णय दिलासादायक आहे; मात्र याची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी पाठपुरावा केल्यानंतरही राज्यातील १५ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांचा प्रश्न रखडला होता. अनेक शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत प्रस्ताव पाठविले होते; मात्र त्यावर जागा उपलब्ध नाहीत, असे मोघम उत्तर मिळत होते. नेमकी हीच परिस्थिती पती-पत्नी एकत्रीकरणाची आहे. काही ठिकाणी या मुद्याची दखल घेतली जाते; मात्र बहुतांश ठिकाणी पती-पत्नी एकत्रीकरणाचा मुद्दा बाजूला सारला जातो.
२९ सप्टेंबर २0११ च्या सरकारी आदेशाने आंतरजिल्हा बदली व पती-पत्नी एकत्रीकरणाचे प्रस्ताव पाठवूनही ते प्रलंबित राहले होते. आता पुन्हा आंतर जिल्हा बदली व पती-पत्नी एकत्रीकरणाचा मुहूर्त सरकारने काढला असून, ग्रामविकास विभागाचे अवर सचिव कांबळे यांनी वर्षनिहाय आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या शिक्षक संवर्गातील प्रवर्गनिहाय यादी तसेच पती-पत्नी एकत्रीकरण, आंतरजिल्हा बदलीसाठी मागणी करणार्‍या कर्मचार्‍यांची माहिती मागविलेली आहे. पात्रताधारकांसाठी हा आशेचा किरण ठरणार आहे.

Web Title: Waiting for interchanged teachers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.