ग्रामपंचायत इमारतींसाठी निधीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:37 IST2021-04-14T04:37:22+5:302021-04-14T04:37:22+5:30

००० रस्त्यावर पुन्हा फेरीवाले वाशिम : शहरातील रस्त्यावर उभे राहून फेरीवाले हे मालाची विक्री करीत असल्याचे सोमवार, मंगळवारी दिसून ...

Waiting for funds for Gram Panchayat buildings | ग्रामपंचायत इमारतींसाठी निधीची प्रतीक्षा

ग्रामपंचायत इमारतींसाठी निधीची प्रतीक्षा

०००

रस्त्यावर पुन्हा फेरीवाले

वाशिम : शहरातील रस्त्यावर उभे राहून फेरीवाले हे मालाची विक्री करीत असल्याचे सोमवार, मंगळवारी दिसून आले. मध्यंतरी रस्त्यावर फेरीवाले राहत नव्हते. आता पुन्हा फेरीवाले हे रस्त्यावर, रस्त्यालगत उभे राहत असल्याचे दिसून येते.

00०००

जऊळका येथे विनामास्क वाहनचालकांचा प्रवास

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन प्रभावित होत असतानाही नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. अनेक वाहनचालक मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मंगळवारी जऊळका परिसरात दिसून आले.

0000

खड्ड्यामुळे वाहनचालकांची गैरसोय

वाशिम : वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील कोविड केअर सेंटरजवळील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सिव्हिल लाईनकडून जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गाकडे वळणाच्या ठिकाणीच खड्डे असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी सोमवारी केली.

........

पोहरादेवी परिसरात नालीसफाईला खो

वाशिम : पोहरादेवी जिल्हा परिषद गटांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये नालीची साफसफाई देखील नियमित होत नाही. नाली सफाई नियमित नसल्याने काही ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नाल्यांची साफसफाई नियमित करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Waiting for funds for Gram Panchayat buildings