शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

वाशिम जिल्ह्याला दुष्काळी सुविधांची प्रतीक्षा; निकष जाहीर करण्यास विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:27 AM

वाशिम : सन २0१७-१८ करिता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे निघाली; मात्र ही घोषणा होऊन २0 दिवस लोटूनही जिल्हय़ाला कुठल्या सुविधा दिल्या जाणार, हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, दुष्काळसदृश स्थितीमधील सुविधांच्या निकषांमध्ये शासन स्तरावरून बदल सुरु असल्याची माहिती असून, सदर निकष जाहीर करण्यास विलंब लागत असल्याने नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देअंतिम पैसेवारी ४७ पैसे

सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २0१७-१८ करिता खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे निघाली; मात्र ही घोषणा होऊन २0 दिवस लोटूनही जिल्हय़ाला कुठल्या सुविधा दिल्या जाणार, हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, दुष्काळसदृश स्थितीमधील सुविधांच्या निकषांमध्ये शासन स्तरावरून बदल सुरु असल्याची माहिती असून, सदर निकष जाहीर करण्यास विलंब लागत असल्याने नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील ७९३ महसुली गावांपैकी ७७४ गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी यंदा ५0 पैशांपेक्षा कमी आढळून आली, तसेच १९ गावांची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पेक्षा जास्त आढळून आली असून, जिल्ह्याची एकूण सरासरी अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे. दरम्यान, पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने साहजिकच दुष्काळसदृश स्थितीत मिळणार्‍या विविध योजनांच्या लाभाकरिता जिल्हा पात्र ठरला आहे. त्यानुसार, टंचाईग्रस्त ७७४ गावांमध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आवश्यकतेप्रमाणे कामे सुरू करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स, बैलगाड्यांमार्फत आवश्यक पाणी पुरवठा, मध्यम व लघुप्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवणे. याशिवाय मंडळ स्तरावर चारा छावणी उघडण्यास मंजुरी मिळणे, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रूपांतरण, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, परीक्षा शुल्कात विद्यार्थ्यांना माफी, शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती, आदी सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना जिल्ह्याची खरीप हंगाम पैसेवारी जाहीर होऊन २0 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून कुठलेच ठोस धोरण अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाल्याने शासन स्तरावरून पुरविल्या जाणार्‍या सर्व सुविधा वाशिम जिल्ह्याला निश्‍चितपणे लागू होणार आहेत; मात्र सुविधांच्या निकषांमध्ये काही अंशी बदल झाल्याची माहिती असून, शासनाकडून याबाबत शासन स्तरावरून स्पष्ट निर्देश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात केली जाईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिम