विहीर योजनेची लाभार्थींना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:40+5:302021-02-05T09:28:40+5:30
००० नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम मेडशी : मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गत दोन ...

विहीर योजनेची लाभार्थींना प्रतीक्षा
०००
नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम
मेडशी : मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गत दोन दिवसांत जवळपास १६० नागरिकांची तपासणी करण्यात आली. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००
जि.प. शाळेत विद्यार्थी उपस्थिती वाढली !
जऊळका रेल्वे : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, जऊळका रेल्वे केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी उपस्थिती वाढल्याचे दिसून येते. सद्य:स्थितीत विद्यार्थी उपस्थिती ५२ टक्क्यांवर पोहोचली आहे.
०००
स्वच्छता रथाद्वारे जनजागृती
किन्हीराजा : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे रथाद्वारे गावोगावी घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन यासह स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती केली जात आहे. किन्हीराजा परिसरातही सोमवारी जनजागृती केली.
००००
सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी
केनवड : रिसोड तालुक्यातील केनवड येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव असून, सरपंचपदी आपली वर्णी लागावी याकरिता इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे मंगळवारी दिसून आले.
००००
पूरसंरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी
रिठद : पावसाळ्याच्या दिवसात नदीला पूर आल्यास रिठद गावात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूरसंरक्षण भिंत उभारण्यासाठी निधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायणराव आरू यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे केली.