कृषी व्यावसायिक शेतक-यांच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: June 4, 2016 02:47 IST2016-06-04T02:47:33+5:302016-06-04T02:47:33+5:30
खरीप हंगाम तोंडावर; मात्र अद्याप शेतक-यांनी बियाणे व खत खरेदी करण्याला प्रारंभच केला नाही.

कृषी व्यावसायिक शेतक-यांच्या प्रतीक्षेत
वाशिम: खरीप हंगाम तोंडावर आला असला, तरी अजून शेतकर्यांनी बियाणे व खत खरेदी करण्याला प्रारंभच केला नाही, त्यामुळे कृषी व्यवसाय सध्या ठप्प असून, तीन वर्षांपासून दुष्काळाने पोळल्यामुळे शेतकरी यावर्षी सावध पवित्रा घेऊन आहेत, तर कृषी व्यावसायिक शेतकर्यांच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्याच्या एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ४ लाख ३0 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होते. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकांचा समावेश असतो. यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजानुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात खरीप पेरणीखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक ७0 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते, तसेच त्यामध्ये तूर, मूग व उडीद ही आंतरपिके घेतली जातात. त्यानुसार पेरणीचे नियोजन करून कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यासाठी ७९ हजार ९३0 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली होती. यापैकी आतापयर्ंत ६0 हजार ७१0 क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले असून, उर्वरित बियाण्यांची आवक सुरू आहे. या पिकांसाठी मागील चार वर्षात सरासरी ४७ हजार १९४ मे. टन खताचा वापर झाला होता. त्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यासाठी ५५ हजार ५00 मे. टन खताची मागणी नोंदविण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत ५७ हजार २00 मे. टनाचे आवंटन राज्य स्तरावरून मंजूर करण्यात आले आहे. मागील आठवड्यापयर्ंत यापैकी २८ हजार ६६४ मे. खत बाजारात उपलब्ध झाले असून, आवंटनाप्रमाणे खताचा पुरवठा सुरू आहे. सर्व पिकांसाठी मुबलक बियाणे व खते बाजारात उपलब्ध होणार असून, बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.