४४ टक्के शेतक-यांच्या बँक खात्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: January 23, 2015 02:02 IST2015-01-23T02:02:46+5:302015-01-23T02:02:46+5:30
दुष्काळ मदत निधी : २६ जानेवारीपूर्वी उद्दिष्ट गाठण्याची कसरत, वाशिम जिल्ह्यात २.३५ लाख शेतकरी लाभार्थी.
_ns.jpg)
४४ टक्के शेतक-यांच्या बँक खात्याची प्रतीक्षा
वाशिम : दोन लाख ३५ हजार ९७७ पैकी एक लाख ३२ हजार २८१ शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक प्रशासनाला प्राप्त झाल्याने २६ जानेवारीपूर्वी दुष्काळ मदत निधीचे वाटप करणे कसरत ठरणार आहे. अजूनही ४३.९५ टक्के शेतकर्यांच्या बँक खाते क्रमांकाची प्रतीक्षा आहे.
२0१४ मधील कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शेतकर्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने मदत जाहीर केलेली आहे. वाशिम जिल्ह्याला ५७ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या मदत निधीचे वितरण २६ जानेवारीपूर्वी करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत. या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी तातडीने शेतकर्यांच्या बँक खाते क्रमांकांची माहिती जमा करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठय़ांना दिल्या.
२२ जानेवारी रोजी दोन लाख ३५ हजार ९७७ पैकी एक लाख ३२ हजार २८१ शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. अजून एक लाख तीन हजार ६९६ शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक जमा करणे बाकी आहे. ५६.0५ टक्के शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक जिल्हा प्रशासनाला मिळाले असून, ४३.९५ टक्के बँक खाते क्रमांक २६ जानेवारीपूर्वी प्राप्त करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.
वाशिम तालुक्यात एकूण नुकसानग्रस्त शेतकरी ४४ हजार आहेत. त्यापैकी २९ हजार शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक तहसील कार्यालयाला प्राप्त झाले असून, बँक १५ हजार बँक खाते क्रमांक प्राप्त करण्याचे काम तलाठय़ांकडून सुरू असल्याचे तहसीलदार आशीष बिजवल यांनी सांगितले.