आज मतदान

By Admin | Updated: October 15, 2014 01:06 IST2014-10-15T01:06:23+5:302014-10-15T01:06:23+5:30

वाशिम जिल्ह्यातील ९0,५,६९0 मतदार बजावणार मतदानाचा हक्क .

Voting today | आज मतदान

आज मतदान

वाशिम: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ९७५ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व रिसोड विधानसभा म तदारसंघातून विधान भवनावर कुणाला पाठवायचे, याचा फैसला जिल्हाभरातील ९ लाख ५ हजार ६९0 मतदार याद्वारे करणार आहेत. राज्याच्या अलीकडच्या काळातील राजकीय इतिहासात आघाडी-युती न होता पहिल्यांदाच प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहे. जिल्ह्या तील वाशिम, रिसोड व कारंजा या तीन मतदारसंघांमध्ये प्रत्येक पक्षाचे व अपक्ष उमेदवार मिळून एकूण ५७ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. दोन महिला, तर ५५ पुरुष आहेत. रिसोड मतदारसंघात विविध पक्षांचे नऊ उमेदवार आणि सात अपक्ष असे एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. वाशिम मतदारसंघात विविध पक्षांचे नऊ आणि ११ अपक्ष असे एकूण २0, तर कारंजा मतदारसंघातून विविध पक्षांचे १0 आणि ११ अपक्ष असे २१ उमेदवार भाग्य अजमावत आहेत. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यात चौरंगी व पंचरंगी असणार्‍या लढती शेवटच्या टप्प्यांत वेगवान राजकीय घडामोडीमुळे तिरंगीवर आल्या आहेत. कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला घरी बसवायचे, याचा फैसला जिल्ह्यातील ९ लाख ५ हजार ६९0 मतदार मतदानाच्या दिवशी करणार आहेत. जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार २३0 महिला मतदार आणि ४ लाख ७४ हजार ४६0 पुरुष मतदार असे एकूण ९ लाख ५ हजार ६९0 म तदार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ९६५ मतदान केंद्रे व १0 सहायक मतदान केंद्रे अशा एकूण ९७५ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे व ४,९४९ अधिकारी-कर्मचार्‍यांना पाठविण्यात आले आहे. तीनही मतदारसंघांमध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप झाले आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात ३0९, वाशिम मतदारसंघात ३४0, तर कारंजा मतदारसंघात ३२६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीनेदेखील संवेदनशील केंद्रांसह इतर सर्व मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस ताफा रवाना करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राहावी, भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, कुठेही अनुचित प्रकार होऊ नये, यावर जिल्हा प्रशासन नजर ठेवून आहे.

Web Title: Voting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.