मतदान ओळखपत्र नसेल तरीही आता करता येईल मतदान

By Admin | Updated: October 12, 2014 02:05 IST2014-10-12T01:59:26+5:302014-10-12T02:05:32+5:30

निवडणूक आयोगाकडून ११ पर्याय जाहीर; मतदार यादीत नाव आवश्यक.

Voting ID card can be done now, even though voting can not be done | मतदान ओळखपत्र नसेल तरीही आता करता येईल मतदान

मतदान ओळखपत्र नसेल तरीही आता करता येईल मतदान

वाशिम : ज्या मतदारांकडे मतदान ओळखपत्र नाही त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने ओळखीचा पुरावा म्हणून ११ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा असेल तर त्या मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पर्यायी ओळखीच्या पुराव्यांमध्ये मतदार चिठ्ठीचा (वोटर स्लीप) चा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांना ही चिठ्ठी घरपोच देण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवली आहे. जिल्ह्यातील ९५ टक्के मतदारांच्या मतदार चिठ्ठीवर त्यांचे छायाचित्र देण्यात आले आहे. त्यामुळे ती मतदार चिठ्ठीचिठ्ठी असताना इतर कोणतेही ओळखपत्र सोबत नसले तरी मतदाराला मतदान करता येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले. मतदान ओळखपत्राला पर्यायी कागदपत्रांमध्ये पासपोर्ट,ड्रायव्हिंग लायसन्स,राज्य व केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील, पब्लिक लिमिटेड कंपनीतील कर्मचार्‍यांचे फोटो असलेले ओळखपत्र, बँक, पोस्टाचे फोटो असलेले पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टरने दिलेले स्मार्ट कार्ड, श्रम मंत्रालयाचे विमा स्मार्ट कार्ड, फोटो असलेले पेन्शन ओळखपत्र,जिल्हा निवडणूक विभागाकडून वाटप करण्यात आलेली फोटो असलेली मतदार चिठ्ठी(वोटर स्लिप) आदींचा समावेश आहे.

Web Title: Voting ID card can be done now, even though voting can not be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.