निवडणूक विभागाने राबविला मतदार नोंदणी कार्यक्रम
By Admin | Updated: August 23, 2014 02:10 IST2014-08-23T01:01:57+5:302014-08-23T02:10:28+5:30
वाशिम जिल्ह्यातील तीन मतदारसंघात वाढले १७६२८ मतदार

निवडणूक विभागाने राबविला मतदार नोंदणी कार्यक्रम
वाशिम - जिल्हय़ातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, गत विधानसभा निवडणुकीत असलेल्या मतदारांमध्ये १७ हजार ६२८ जणांची वाढ झाली आहे.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनर्रिक्षणणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ९ ते ३0 जूनदरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची विशेष मोहीम राबविली. यादरम्यानवाशिम जिल्ह्यातील १८ हजार ३१३ नवीन मतदारांनी आपले नावे मतदार यादीत नोंदविली. त्यापैकी १७,६२८ मतदारांची नावे नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत १७ हजार ६२८ मतदारांची वाढ झाली. मतदार नोंदणी कार्यक्रमात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदार यादीत नावे नसलेल्या, नावांत व तपशिलात दुरुस्ती, नावे वगळणी इ. बाबीवर या मोहिमेंतर्गंत नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमांतर्गंत वाशिम जिल्हय़ामध्ये महिला मतदार व युवा मतदारांचे संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
नवीन मतदारांमध्ये युवा व महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.