पावसाचा खंड; शेतकऱ्यांकडून सिंचनाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:13+5:302021-08-15T04:41:13+5:30
वाशिम जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मिमी पाऊस अपेक्षित असताना १ जुन ते १४ ऑगस्टच्या कालावधीत ५७२.५ मिमी ...

पावसाचा खंड; शेतकऱ्यांकडून सिंचनाचा
वाशिम जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मिमी पाऊस अपेक्षित असताना १ जुन ते १४ ऑगस्टच्या कालावधीत ५७२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ७२.६ टक्के आहे. अर्थात, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३४ लघू मिळून १३७ प्रकल्पांत सरासरी ६३.०८ टक्के जलसाठा आहे. अर्थात, प्रकल्पांची पातळीही समाधानकारक असून, पिकांची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, काही भागांत १० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत, तर काही शेतकऱ्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
----------------------
१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ५०२.४ मिमी
प्रत्यक्ष झालेला पाऊस - ५७२.५ मिमी
-----------------------
२) पिकांना सिंचनाचा आधार
सोयाबीन- ३,०२६९२.४४
तूर - ६००५४.०३
कपाशी - २१३६७.१२
उडीद - ६९९४.४७
-----------------------
३) पाणीसाठा ६३ टक्क्यांवर
लघू - ६०.०५
मध्यम - ७४.४९
मोठे - ००
-----------------------
४) उसनवारी कशी फेडणार?
१) कोट: कारंजा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यात पावसाने १० दिवसांपासून खंड दिल्याने पिके संकटात सापडली आहेत. येत्या तीन-चार दिवसांत दमदार पाऊस न पडल्यास पिके सुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिके हातची गेल्यास उसनवार कशी फेडायची, ही चिंता सतावत आहे.
- नितीन भिंगारे, शेतकरी जानोरी.
--------
२) कोट: दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यात उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे पिके सुकत आहेत. काही शेतकरी नाईलाजास्तव सिंचनाचा आधार घेत आहेत, परंतु पावसाच्या भरवशावरच असलेल्या शेती पिकांची स्थिती वाईट असून, पिके संकटात असल्याने कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- डिगांबर पाटील उपाध्ये, शेतकरी
५) कृषी अधिकाऱ्याचा कोट
१) कोट: जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली आहे. बहुतांश भागांत पिकांची स्थिती चांगली असून, पाच-सहा दिवस पिके तग धरण्यासारखीच आहेत. ज्या भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्या भागांत शेतकऱ्यांनी पिकांत डवरणीचे फेर द्यावे. पिकांत डवरणी केल्यास पिकांना आधार मिळून स्थिती सुधारेल.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी