वीज पडून विठोली येथील शेतकरी जखमी

By Admin | Updated: March 19, 2017 02:33 IST2017-03-19T02:33:13+5:302017-03-19T02:33:13+5:30

वीज पडून नामदेव वाळले (४२) हे शेतकरी गंभीर जखमी झाले.

Vitholi farmer injured after planting electricity | वीज पडून विठोली येथील शेतकरी जखमी

वीज पडून विठोली येथील शेतकरी जखमी

मानोरा, दि. १८- तालुक्यात १६ मार्च रोजी वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसादरम्यान विठोली येथे वीज पडून नामदेव वाळले (४२) हे शेतकरी गंभीर जखमी झाले.
मानोरा तालुक्यात १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी विठोली शेतशिवारात नामदेव गुलाबराव वाळले हे स्वत:च्या शेतातील सौंदळीच्या झाडाखाली उभे होते. त्यावेळी अचानक वीज झाडावर कोसळल्याने नामदेव वाळले गंभीर जखमी झाले.
त्यांना तत्काळ मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. नामदेव वाळले यांच्याकडे एकूण अडीच एकर शेती असून, त्यांच्यावर आई, पत्नी, दोन मुले अशा मोठय़ा कुटुंबाची जबाबदारी आहे.
 

Web Title: Vitholi farmer injured after planting electricity