शौचालय नसलेल्या कुटुंबियांच्या घेतल्या भेटी
By Admin | Updated: October 17, 2014 00:41 IST2014-10-17T00:41:38+5:302014-10-17T00:41:38+5:30
राष्ट्रीय स्वच्छता अभियान; वाशिम जिल्हा परिषदेचा अंतरव्यक्ति संवादातून मतपरिवर्तनाचा प्रयत्न.

शौचालय नसलेल्या कुटुंबियांच्या घेतल्या भेटी
वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हय़ात राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविले जात आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने निवडलेल्या गावात जाणीव जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात असून, आतापर्यंंंत जिल्हय़ातील १५६0 कुटुंबांना भेटी देण्यात आल्या आहेत. शौचालय नसलेल्या कुटुंबाशी अंतरव्यक्ती संवादातून मानसिकता बदलण्याचे प्रयत्न जिल्हा व तालुकास्तरावरील सल्लागार करीत आहेत. संपूर्ण जिल्हय़ात २५ सप्टेंबरपासून राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविल्या जात आहेत. यासाठी ४४ ग्रामपंचायती जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी दत्तक घेतल्या आहे त. विशेषत: शौचालय नसलेल्या कुटुंबियांना भेटी देऊन त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करून मार्गदर्शन केल्या जात आहे. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी १0 ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि गटसमन्वयक यांची बैठक जिल्हा कक्षाच्यावतीने घेण्यात आली होती.