नियमाचे उल्लंघन, पोलिसांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:49 IST2021-09-24T04:49:05+5:302021-09-24T04:49:05+5:30

.............. कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात वाशिम : कोरोना संकट काळात प्रत्येकी तीन महिन्यांच्या करार तत्त्वावर नियुक्ती मिळालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ...

Violation of rules, negligence of police | नियमाचे उल्लंघन, पोलिसांचे दुर्लक्ष

नियमाचे उल्लंघन, पोलिसांचे दुर्लक्ष

..............

कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

वाशिम : कोरोना संकट काळात प्रत्येकी तीन महिन्यांच्या करार तत्त्वावर नियुक्ती मिळालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची काही दिवसांपूर्वी करार संपुष्टात आणण्यात आला. यामुळे संबंधित कर्मचारी संतापले असून आंदोलनात्मक पवित्रा घेऊ, असा इशारा पुष्पक राठोड यांनी दिला.

..............

अडोळी येथे धुवाधार पाऊस

वाशिम : तालुक्यातील अडोळी येथे २३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास धुवाधार पाऊस कोसळला. यामुळे ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. अनेकांची वाहने बराचवेळ साचलेल्या पाण्यात डुबली होती. या पावसामुळे पिकांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

...................

बालरुग्णालये गर्दीने हाऊसफुल्ल

वाशिम : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या व्यक्तीप्रमाणेच लहान मुलांनाही संसर्गजन्य आजारांची लागण होण्याचे प्रकार बळावले आहेत. सर्दी, खोकला आणि ताप अशा लक्षणांनी लहान मुले त्रस्त असून बालरुग्णालये गर्दीने हाऊसफुल्ल होत असल्याचे पाहवयास मिळत आहे.

Web Title: Violation of rules, negligence of police