अंगणवाडी सेविका, मदतनीस पदभरती जाहीरनाम्याचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:28+5:302021-02-05T09:24:28+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा या गावात सर्वाधिक लोकसंख्या बंजारा समाजाची आहे. त्यामुळे जाहीरनाम्यात अंगणवाडी सेविका व ...

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदभरती जाहीरनाम्याचे उल्लंघन
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा या गावात सर्वाधिक लोकसंख्या बंजारा समाजाची आहे. त्यामुळे जाहीरनाम्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांसाठी स्थानिक बंजारा बोलीभाषा असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावे, इतरांनी केल्यास ते रद्द समजण्यात येतील, अशी अट घालण्यात आली आहे. असे असतानाही इतर बोलीभाषा असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर उमेदवारांच्या प्राथमिक निवड यादीत संबंधित चार लोकांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीरनाम्याचे उल्लंघन केले आहे. याबाबत ३० डिसेंबर २०२० रोजी बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करूनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे न्याय देण्यात यावा, अशी मागणीही ज्योती चव्हाण यांनी निवेदनात केली आहे.
.............
कोट :
ज्योती चव्हाण यांची तक्रार प्राप्त झाली आहे. हे प्रकरण चौकशीत असल्याने अद्याप कोणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही. पदभरती नियमानुसारच करण्यात आली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही.
- संजय जोल्हे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., वाशिम