विनायकनगर विकासापासून अजूनही कोसोदूर
By Admin | Updated: June 16, 2014 00:43 IST2014-06-16T00:17:40+5:302014-06-16T00:43:40+5:30
खेड्यांपेक्षाही वाईट परिस्थितीतून स्थानिक विनायकनगरमधील नागरिक वाटचाल करीत आहेत.

विनायकनगर विकासापासून अजूनही कोसोदूर
वाशिम : खेड्यांपेक्षाही वाईट परिस्थितीतून स्थानिक विनायकनगरमधील नागरिक वाटचाल करीत आहेत. तसा म्हणायला दरवर्षी वार्डांचा विकास होतो. पण, रस्त्यांवर खड्डे, तुंबलेल्या नाल्या, अंधारात हरविलेले विजेचे खांब, चिखलाचे साम्राज्य, अनियमित पाणीपुरवठा, कच्चा रस्ता या समस्या या नगरातील नागरिकांच्या नशिबी कायमच आहेत. या नगरातील समस्या सोडविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश उबाळे यांच्यासह या भागातील नागरिकांनी केली आहे. नवीन पोलीस वसाहतीमागील या नगराचा मूलभूत विकास तर सोडाच; शहरापासून काहीसा संपर्क तुटलेले आणि कायम दुर्लक्षित असलेले विनायकनगर ह्यभकासह्ण झाले आहे. मुलभूत सुविधापासून नागरिक वंचित झाले आहे. नगरपरिषदेच्या नव्या प्रशासनाने तरी नियोजनानुसार या समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विनायकनगरात प्रवेश करणारा मार्गच सर्वकाही सांगून जातो. एरिगेशन कॉलनीतून जाणार्या रस्त्यांवर चिखल व खड्डय़ांचे साम्राज्य असते. रस्ता खडीकरण झाले नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात वाहनधारकांची तारांबळ उडत असते. गाडी जेथे चिखलात फसली तेथेच सोडून द्यावी लागते, असे अनुभव नागरिकाना नेहमीच येतात. याकडे लक्ष देण्याची मागणी योगेश उबाळे यांनी केली आहे.