दुर्गम भागात वसलेली गावे लसीकरणापासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST2021-05-31T04:29:20+5:302021-05-31T04:29:20+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ नंतर कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. त्यात बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता ...

दुर्गम भागात वसलेली गावे लसीकरणापासून दूरच
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ नंतर कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. त्यात बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासनाने एकीकडे जिल्हाभरात ९ मे पासून कडक निर्बंध लागू केले; तर दुसरीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला. यासह गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण मोहीमही राबविण्यात येत आहे; मात्र त्यास म्हणावी तशी गती अद्याप प्राप्त झालेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे मानोरा व मालेगाव तालुक्यातील ३३ आदिवासीबहुल गावांमधील बहुतांश व्यक्ती कोरोना लसीकरणापासूनही दूर असल्याचे दिसून येत आहे. या भागात आरोग्य विभागाने विशेष शिबिरांचे आयोजन करून कोरोना संसर्गास अटकाव करण्याची मागणी होत आहे.
....................
जिल्ह्यातील आदिवासीबहुल गावे
मालेगाव तालुका : तालुक्यात पिंपळवाडी, खैरखेडा, भामटवाडी, गांगलवाडी, वाकळवाडी, कोलदरा, काळाकामठा, उमरवादी, मुंगळा, मालेगाव किन्ही, धरमवाडी, पिंपळशेंडा, वाडी रामराव, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, धमधमी, कवरदरी, उडी, भीलदुर्ग, भाैरद, सवडद.
मानोरा तालुका : गिराटा, विळेगाव, पिंपळशेंडा, ढोणी, खांबाळा, मेंद्रा, वटफळ, रुई, उज्वलनगर, पाळोदी, रणजितनगर, रतनवाडी