गावोगावी गृहभेटी व जनजागृती
By Admin | Updated: October 27, 2016 03:18 IST2016-10-27T03:18:24+5:302016-10-27T03:18:24+5:30
‘स्वच्छ निर्मल दिवाळी उत्सव’ उपक्रमासाठी कलावंतांची निवड.

गावोगावी गृहभेटी व जनजागृती
वाशिम, दि. २६- गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी दिवाळीदरम्यान स्वच्छ निर्मल दिवाळी उत्सव हा उपक्रम कलावंतांच्या माध्यमातून २६ ऑक्टोबरपासून राबविण्याला सुरुवात झाली.
सदर उपक्रम २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, गृहभेटीद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या. गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, स्वच्छागृही, आशा, अंगणवाडी कार्यकर्ते व स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांना सोबत घेऊन हा उपक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या आहेत. तालुका व जिल्हा कक्षातील समन्वयक, सल्लागार यांच्यावर या कार्यक्रमांचे नियोजन करण्याची जबाबदारी सोपविली आहे.
२६ ऑक्टोबर रोजी पार्डी टकमोर, गणेशपूर येथे प्रज्ञानंद भगत, सुशिलाबाई घुगे या कलावंतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तोंडगाव, तांदळी शेवई येथे वामन वाणी व पी.एस. खंदारे, एकांबा व वाघळूद येथे विलास भालेराव व विद्या भगत तर जामखेड व बोर्डी येथे उत्तम इंगोले व केशव डाखोरे या कलावंतांच्या माध्यमातून गृहभेटीद्वारे जनजागृती करण्यात आली.
२७ ऑक्टोबर रोजी मांगूळझनक व पिंप्री सरहद्द येथे उत्तम इंगोले, केशव डाखोरे, लोणी बु., वाडी रायताळ येथे वामन वाणी, पी.एस. खंदारे, लावणा व कोठारी येथे प्रज्ञानंद भगत व सुशिलाबाई घुगे तर गोगरी व दाभडी येथे विलास भालेराव व विद्या भगत या कलावंतांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
२८ ऑक्टोबर रोजी फुलउंबरी व वाईगौळ येथे वामन वाणी व पी.ए. खंदारे, इंझोरी व दापुरा येथे विलास भालेराव व विद्या भगत, कामरगाव व पोहा येथे प्रज्ञानंद भगत व सुशिलाबाई भगत या कलावंतांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. २९ ऑक्टोबर रोजी धामणी खडी, धनज बु. आगरवाडी व बाळखेड येथे कलावंतांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.