समृद्ध गाव स्पर्धेसाठी गावकरी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:18+5:302021-02-05T09:27:18+5:30

वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेसाठी कारंजा, मंगरुळपीर तालुक्यातील गावकरी सरसावले असून त्यांना प्रशासनासह लाेकप्रतिनिधींचे माेलाचे सहकार्य लाभत आहे. समृद्ध ...

Villagers rushed for a prosperous village competition | समृद्ध गाव स्पर्धेसाठी गावकरी सरसावले

समृद्ध गाव स्पर्धेसाठी गावकरी सरसावले

वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेसाठी कारंजा, मंगरुळपीर तालुक्यातील गावकरी सरसावले असून त्यांना प्रशासनासह लाेकप्रतिनिधींचे माेलाचे सहकार्य लाभत आहे.

समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत गावकरी, शेतकऱ्यांसह बचत गटाचा सहभाग वाढावा या उद्देशाने विविध ग्रामपंचायततर्फे शेतकरी व नारी शक्ती सन्मान व बचत गटांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून गावकरी, शेतकऱ्यांसह महिला बचत गटांना स्पर्धेची संपूर्ण माहिती देण्यात येत आहे. समृद्ध गाव स्पर्धेेअंतर्गत आयोजित कार्यक्रमाला गावातील महिलांसह पुरुषांचा माेठा सहभाग लाभत आहे.

या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनात समृध्द गाव समृध्द चर्चा यावर कार्यशाळा, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक सुमित गाेरेले यांचे मार्गदर्शन, मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील प्रगत गावाच्या आढाव्याविषयी चर्चा, कृषीसंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर ताेटावर यांचे मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन माेलाचे ठरले. विविध गावांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकीत गावातील गुणांकानुसार नियाेजन करून टीमनुसार काम विभागणी करण्यात येत आहे. यावेळी संबधित गावातील जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, कृषी मित्र, बँक सखी, पशू सखी, शिपाई, ऑपरेटर, तालुका समन्वयक, जलमित्रांचा समावेश आहे. या स्पर्धेत यशस्वी ठरण्यासाठी गावकरी सरसावले आहेत.

...................

महिलांचा पुढाकार

गाव समृध्द व्हावे याकरिता महिलांचा सुध्दा पुढाकार दिसून येत आहे. समृध्द गाव स्पर्धेच्या माध्यमातून महिलासुध्दा व्यवसायाकडे वळल्या पाहिजे, त्यांनी उपजीविका सुरू केली पाहिजे व प्रत्येक महिला बचत गटाशी जाेडली गेली पाहिजे याकरिता महिला पुढाकार घेताना दिसून येत आहेत.

...........

आजपासून पाणलाेट काम

समृध्द गाव स्पर्धेअंतर्गत ३ फेब्रुवारीपासून तपाेवन येथे पाणलाेट विकासासंबधी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सर्व अधिकारी सकाळी ७ वाजता तपाेवन येथे पाेहचून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करणार आहेत.

Web Title: Villagers rushed for a prosperous village competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.