ग्रा.प.हद्दीत दारु दुकान परवान्याला ग्रामस्थांचा विरोध
By Admin | Updated: May 23, 2017 17:42 IST2017-05-23T17:42:00+5:302017-05-23T17:42:00+5:30
ग्रामपंचायत हद्दीत परवाने दिल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

ग्रा.प.हद्दीत दारु दुकान परवान्याला ग्रामस्थांचा विरोध
मंगरुळपीर: देशी-विदेशी दारुचे दुकान गटग्रामपंचायत जांब येथे विक्रीचे आणी परमिट न देणेसाठी येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे कळविले आहे. मंगरुळपीर शहरातील हायवेवरील दारुचे दुकान बंद करण्यात आले आहे.त् याकारणाने काही बारमालक आपली दुकाने खेडेविभागाकडे वळविन्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पंचायत समितीअंतर्गत असलेल्या जांब पंचायत समिती अंतर्गतच्या जांब- शहापुर ग्रामहद्दीत व्यसनमूक्त लोक आहेत.या हद्दीत जर दारुविक्रीचे परवाने दिल्यास येथे व्यसनाचे प्रमाण वाढेल.जर प्रशासनाने जांब ग्रामपंचायत हद्दीत दारु विक्रीचे परवाने दिल्यास शहापुर, आजगाव, जांब, सोनखास येथील रहिवाशी आमरण ऊपोषणास बसनार असा ईशारा जिल्हाधिकारी,वाशिम यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे गजानन मोरे यांचेसह ग्रामवाशियांनी दिला.