लोकवर्गणीतून भरली ग्रामस्थांनी पाणीपट्टी

By Admin | Updated: November 23, 2014 00:17 IST2014-11-23T00:17:31+5:302014-11-23T00:17:31+5:30

जीवन प्राधिकरणद्वारे तळप बु. येथील बंद पाणीपुरवठा पुर्ववत.

Villagers filled the public with a water tank | लोकवर्गणीतून भरली ग्रामस्थांनी पाणीपट्टी

लोकवर्गणीतून भरली ग्रामस्थांनी पाणीपट्टी

तळप बु. (मानोरा, जि. वाशिम) : मानोरा तहसीलअंतर्गत येत असलेल्या तळप बु. येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या थकबाकीपैकी ५0 टक्के रक्कम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून भरल्यामुळे गेल्या पाच वर्षापासून बंद झालेला पाणी पुरवठा अखेर सुरू क रण्यात आला आहे.
मानोरा तहसीलअंतर्गत येत असलेल्या तळप बु. येथे गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याविषयी तळपवासीयांनी पुढाकार घेवून आणि उपविभाग कारंजा यांच्या सहकार्याने अखेर २८ गाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना सुरू केली. आजरोजी गावामध्ये १00 च्या वर नळधारक असून घराघरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहचत आहे अन् गावकर्‍यांची तहान भागत आहे.
मानोरा तालुक्यातील २८ गावातील पाणी समस्या सोडविण्याच्या हेतुने सन २00८ मध्ये २८ गाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेत तालुक्यातील २८ गावांचा समावेश असला तरी, आजरोजी १४ गावांनाच या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. बाकी गावे अजुन तहानलेलीच आहे. मौजा तळप बु. येथे सन २00८ मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली. काही महिने या योजनेद्वारे गावात पाणीपुरवठा करण्यात आला त्याची थकबाकी ४८ हजार रूपये असल्याचे उ पविभाग कारंजा कार्यालय सांगत होते.
मागील ही थकबाकी भरल्याशिवाय गावात पाणी सोडता योणार नाही असे वरिष्ठ अधिकारी सांगत होते. येथील नागरिकांनी लोकवर्गणीतून ५0 टक्के रक्कम गोळा करून भरले आणि त्यानं तर ही योजना सुरू झाली.

Web Title: Villagers filled the public with a water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.