सुस्थितीत असलेल्या शाळा खाेलीच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थ संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST2021-06-04T04:31:47+5:302021-06-04T04:31:47+5:30
उंबर्डा बाजार ... येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत ...

सुस्थितीत असलेल्या शाळा खाेलीच्या दुरुस्तीबाबत ग्रामस्थ संभ्रमात
उंबर्डा बाजार ... येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत सन २००७ - ०८ मध्ये बांधण्यात आलेल्या वर्ग खोलीच्या छताची पुन्हा जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दुरुस्ती करण्यात येत असल्याने गावात उलटसुलट चर्चेला जोर आला असून गावकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे.
उंबर्डा बाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत एक षटकोनी आकाराची वर्ग खोली सन १९०७-०८ या आर्थिक वर्षात बांधण्यात आली हाेती. सद्य:स्थितीत सदर शाळेची इमारत सुस्थितीत असताना छताची दुरुस्ती करण्यात येत असल्याने गावकरी मंडळीत संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे छताचे नवीन काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असताना या कामाकडे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.