महावितरणच्या पथकाने दिल्या गावोगावी भेटी

By Admin | Updated: January 22, 2015 00:25 IST2015-01-22T00:25:27+5:302015-01-22T00:25:27+5:30

लोकमत स्टिंग ऑपरेशनचे वृत्त प्रकाशित होताच वीज चोरांनी काढले आकोडे.

Village visits by the MSEDCL | महावितरणच्या पथकाने दिल्या गावोगावी भेटी

महावितरणच्या पथकाने दिल्या गावोगावी भेटी

वाशिम: महावितरण कंपनीला अंधारात ठेवून परस्पर सर्व्हिस लाईन टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार सुरूे असल्याचे लोकमतकडून २0 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनचे वृत्त २१ जानेवारीच्या अंकात प्रकाशित केले होते. या स्टिंग ऑपरेशनची दखल घेवून आज सकाळीच वीज चोरी होत असलेल्या गावांमध्ये पथकांनी जावून भेटी दिल्यात पण नागरिकांना आधिच माहिती झाल्याने पथकाला खाली हात परतावे लागले.
लोकमतने जिल्हयातील कारंजा तालुक्यातील इंझोरी, कामरगाव तर मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे वीज चोरीचा प्रकार सर्रास दिसून येत असल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर महावितरणच्यावतिने नेमण्यात आलेल्या पथकाने सर्वप्रथम याच गावांची भेटीसाठी निवड केली. प्रत्येक गावात भेटी दरम्यान विद्युत खांबासहित घरगुती वीज चोरी होते काय याची सुध्दा शहनिशा केली परंतु काही गावकर्‍यांना आपण करीत असलेल्या चोरीची व गावात पथक येणार असल्याची माहिती झाल्याने त्यांनी सकाळीच विद्युत खांबावर टाकण्यात आलेले आकोडे काढून टाकले. पथकाने गावात भेटी दिल्या त्यावेळी कोठेही विज चोरी उघडकीस आली नाही, यापुढे वीज चोरांवर कारवाईसाठी धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे महावितरण विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले.
महावितरण कंपनीकडून प्राप्त माहितीनुसार आज सकाळी लोकमतचा अंक वाचल्याबरोबर सुरूवातीला याच गावांना भेटी देण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. तसेच २0 जानेवारी रोजी जिल्हयातील सर्व कनिष्ठ अभियंत्यांच्या बैठकीनुसार वीज चोरीप्रकरणी कारवाई करण्याचे सर्वांना उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आता वीज चोरी करणार्‍यांवर विशेष लक्ष दिल्या जाणार आहे.

Web Title: Village visits by the MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.