बेलखेड येथे गावसभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:08+5:302021-02-05T09:22:08+5:30
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या बेलखेड येथे आयोजित गावसभेला मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी ...

बेलखेड येथे गावसभा उत्साहात
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या बेलखेड येथे आयोजित गावसभेला मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांची उपस्थिती होती. या सभेत गाव समृद्ध करण्यासाठी शेतकरी, गावकऱ्यांनी कोणकोणती कामे केली व पुढील नियोजन याची संपूर्ण मांडणी जि. प. सदस्य चंद्रकांत डोईफोडे यांनी आपल्या प्रस्ताविकातून केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी गावकरी व शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ कशी होईल, मातीचे आरोग्य कसे सुधारेल, नॅपेडद्वारा कंपोस्ट खत कसे तयार करावे, या विषयी सविस्तर माहिती दिली, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी स्पर्धेची मूल्यांकन पद्धत समजावून सांगतानाच व या पद्धतीनुसार काम केल्यास गाव निश्चितच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
-------------------
वित्तीय साक्षरतेबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन
पोहरादेवी : मानोरा तालुक्यात रिझव्र्ह बँकेच्या सूचनेनुसार क्रिसील फाउंडेशनकडून वित्तीय साक्षरतेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. या अंतर्गत मानोरा येथील वित्तीय साक्षरता केंद्राकडून शुक्रवारी पोहरादेवी परिसरातील गावांत महिला बचत गटांसह ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.