१.२९ लाखांची गावठी दारू केली नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:23 IST2021-03-29T04:23:43+5:302021-03-29T04:23:43+5:30

प्राप्त माहितीनुसार, रिसोड शहरातील माणुसकी नगर व जिजाऊ नगर भागात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे ...

Village liquor worth Rs 1.29 lakh destroyed | १.२९ लाखांची गावठी दारू केली नष्ट

१.२९ लाखांची गावठी दारू केली नष्ट

प्राप्त माहितीनुसार, रिसोड शहरातील माणुसकी नगर व जिजाऊ नगर भागात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या पथकाने सकाळी ५ ते ८ या वेळेत धाड टाकली. दरम्यान, माणुसकी नगर भागातील संजय शेषराव पवार याच्या ताब्यातून गावठी हातभट्टी दारू २० लीटर व मोहामाच सडवा ४०० लिटर असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल मोक्यावर नष्ट करण्यात आला. तसेच दिलीप पवार याच्या ताब्यातून गावठी हातभट्टी दारू २० लीटर व ३०० लीटर मोहामाच सडवा असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यासह जिजाऊ नगर परिसरातील शांताबाई बाबला पवार हिच्या ताब्यातून गावठी हातभट्टी दारू १५ लिटर व २०० लीटर मोहामाच सडवा असा एकूण २४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला व शिवाजी शामराव काळे याच्या ताब्यातून गावठी हातभट्टी दारू २० लीटर व २०० लिटर मोहामाच सडवा असा २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर नष्ट करण्यात आला. याप्रकरणी नमूद चारही इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, पोलीस उप निरीक्षक शब्बीर खान पठाण, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक नारायण जाधव, पो.ना. सुनील पवार, राजेश राठोड, पोलीस शिपाई निलेश इंगळे, किशोर खंडारे व चालक सहा.पो.उप.निरीक्षक रमेश थोरवे यांनी सहभाग नोंदविला. या कारवाईमुळे जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Village liquor worth Rs 1.29 lakh destroyed