गणेशपूर येथे गावस्तरीय विलगीकरण कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:38+5:302021-05-30T04:31:38+5:30

शहरी भाग प्रमाणेच ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. दरम्यान, बाधित लोकांना गावातच विलगीकरणाची ...

Village level segregation cell operational at Ganeshpur | गणेशपूर येथे गावस्तरीय विलगीकरण कक्ष कार्यान्वित

गणेशपूर येथे गावस्तरीय विलगीकरण कक्ष कार्यान्वित

शहरी भाग प्रमाणेच ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. दरम्यान, बाधित लोकांना गावातच विलगीकरणाची सोय केल्यास प्रशासन व आरोग्य विभागास त्यांच्यावर देखरेख ठेवणे सोपे होणार आहे, या हेतूने गावस्तरीय विलगीकरण कक्ष स्थापन केले जात आहेत. पंचायत समिती सदस्य मीना राऊत व सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊत यांनी पुढाकार घेऊन गणेशपूर येथे जिल्हा परिषद शाळेत कक्ष स्थापन केला. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परिहार होते. गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, नोडल अधिकारी अरविंद ठाकूर, वैद्यकीय अधिकारी डाॅ काळे, ग्रामसचिव व्यवहारे, माहोलकर, रामभाऊ इंगोले, मुख्याध्यापक बेलखेडे, शिवशंकर ठाकरे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Web Title: Village level segregation cell operational at Ganeshpur