स्वस्त धान्य वितरणात दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:59+5:302021-08-15T04:41:59+5:30
----------------- पोलिसांकडून वाहनांवर कारवाई वाशिम : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, पुसदमार्गे परजिल्ह्यांतून येणाऱ्या दुचाकी वाहनांची ...

स्वस्त धान्य वितरणात दक्षता
-----------------
पोलिसांकडून वाहनांवर कारवाई
वाशिम : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, पुसदमार्गे परजिल्ह्यांतून येणाऱ्या दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. या अंतर्गत जागमाथा फाट्यावर शुक्रवारी १२ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
------
पीककर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे
वाशिम : राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने शेतकरी वारंवार पीककर्जासाठी बँकांच्या वाऱ्या करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात शुक्रवारी पाहायला मिळाले.
--------------------
शेतकरी गटाला अनुदान देण्याची मागणी
काजळेश्वर : शासनाच्या ‘उन्नत शेती - समृद्ध शेती’ या घोषणेनुसार शेती व्यवसाय करण्यास मदत व्हावी म्हणून शासनाने काजळेश्वर येथील बळिराजा स्वयंसहायता शेतकरी गटास अनुदान द्यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली आहे.
---------------
आशा, गटप्रवर्तकांच्या मागण्या प्रलंबित !
वाशिम : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या दरमहा मानधनात वाढ करावी, यासह इतर मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आशा सेविकांकडून शुक्रवारी प्रशासनाकडे करण्यात आली.
--------------
गर्दी टाळण्याचे गावकऱ्यांना आवाहन
वाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी व्हायला नको. ही बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांनी गावात होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन खंडाळा ग्रामपंचायतीने शनिवारी ग्रामस्थांना केले.