शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ग्रामीण भागातील दक्षता समित्या ‘कागदावर’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 16:12 IST

मानोरा : रेशन धान्य, केरोसीन पुरवठा पारदर्शक व्हावा, सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय, ग्रामीण पातळीवर दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या. परंतु केवळ मासिक बैठकीला हजेरी लावण्यापर्यंतच या समित्यांचे कार्य मर्यादीत झाल्याने अनेक समित्या केवळ ‘कागदा’वरच असल्याचे चित्र मानोरा तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : रेशन धान्य, केरोसीन पुरवठा पारदर्शक व्हावा, सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय, ग्रामीण पातळीवर दक्षता समित्या गठीत करण्यात आल्या. परंतु केवळ मासिक बैठकीला हजेरी लावण्यापर्यंतच या समित्यांचे कार्य मर्यादीत झाल्याने अनेक समित्या केवळ ‘कागदा’वरच असल्याचे चित्र मानोरा तालुक्यात पाहावयास मिळत आहे.सार्वजनिक वितरण प्रणालीवर अंकुश राहावा, वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी, ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा व्हावा यासाठी तालुकास्तरीय दक्षता समिती गठीत करण्यात येते. याप्रमाणेच गावपातळीवरही दक्षता समितीचे गठण केले जाते. तालुक्यात होणारा धान्य पुरवठा खरोखरच गोरगरीब जनतेपर्यंत पोहचतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी या समितीची आहे. परंतू, नियमित तपासणीच केली जात नाही. इ-पॉश मशीनवर वृध्द, गोरगरीब जनतेचे ठसे उमटत नाहीत, तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचे या लाभार्थींचे म्हणणे आहे. या तक्रारीकडेही समितीचे लक्ष नसल्याचे दिसून येते. काही ग्राहक रोजगाराच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत; त्यांच्या नावावर येणाºया धान्याची उचल कशी होते आदी बाबींकडे स्थानिक दक्षता समितीने प्रत्यक्ष स्थानिक रेशन वितरकांकडे भेटी देणे आवश्यक आहे. शिवाय रेशन धान्य दुकानदाराने आपल्या दुकानाच्या दर्शनी भागास फलक लावणे आवश्यक आहे. दर फलक लावताना किती मालाची उचल झाली, किती माल शिल्लक आहे, त्या मालाचे शासकीय दर किती आहे व ग्राहकांना तो माल शासकीय दरात विकल्या जातो का, दुकानात तक्रारी नोंद वही ठेवण्यात आली आहे का आदी बाबींची पडताळणीही दक्षता समितीला करावी लागते. तालु्क्यातील अनेक रेशन दुकानांत दर्शनी भागात दरपत्रक लावले नाहीत. यावरून दक्षता समित्या केवळ मासीक बैठकीपुरत्या मर्यादीत उरल्याचा आरोप लाभार्थींमधून होत आहे. दक्षता समित्याची मासीक बैठक दर महिन्याला होत असते. परंतू, या बैठकीत घेतलेल्या ठरावाची  अंमलबजावणी फारशी होत नाही अशी ओरड  ग्रामीण भागातुन होत आहे. ग्रामीण भागात स्थानिक रेशन दुकानदार, केरोसीन वितरक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता समिती गठीत आहे. त्या समितीचे अध्यक्ष सरपंच  असतात तर ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व ग्रा.पं. सदस्य त्या समितीचे सदस्य आहेत. परंतु या समित्या केवळ कागदावरच पाहावयास मिळतात. ग्रामीण  भागातील समित्यांना आपल्या अधिकाराची जणू जाणीवच नाही, असा आरोप ग्रामीण भागातून होत आहे. 

तालुका दक्षता समितीच्या बैठका नियमित होतात. बैठकी दरम्यान वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी, यासाठी विविध ठराव घेतले जातात. तरीसुध्दा कुठे ग्राहकांची अडवणूक होत असेल तर त्यांनी दक्षता समितीकडे तक्रारी कराव्या.- सुदाम तायडेसदस्य, दक्षता समिती मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा