शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:24 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

- संतोष वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वीच रिसोड विधानसभा मतदारसंघात वातावरण तापत असून, काँग्रेसचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.पूर्वाश्रमीचा मेडशी विधानसभा मतदारसंघ आणि २००९ मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता उर्वरीत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने राजकीय समिकरणेही बदलली आहेत. काँग्रेससह भाजपामध्येही गटबाजी असल्याने या गटबाजीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न शिवसेना, शिवसंग्राम या पक्षाकडून होत असल्याचे दिसून येते.शिवसेना, भाजपा या पक्षाची युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईवारी सुरू ठेवली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून विद्यमान आमदारांचे तिकट निश्चित मानले जात असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख कोणती भूमिका घेतात, यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. अनंतराव देशमुख यांनी पूत्र नकुल यांच्यासाठी समर्थकांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी केली होती. त्यांनी आपला निर्णय राखून ठेवल्याने काँग्रेसच्या गोटात तुर्तास तरी अस्वस्थता असल्याचे दिसून येते. दुसरीकडे अंतर्गत गटबाजीवर तोंडसुख घेत भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी जवळ केली आहे. सोबतच राकॉचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी देखील वंचित आघाडीची वाट धरल्याने चुरस निर्माण झाली.सेना, भाजपा व शिवसंग्राम या तिनही पक्षाच्या इच्छूकांनी रिसोड मतदारसंघावर दावा ठोकल्याने तिढा वाढला आहे. सेना, भाजपा युती संदर्भात वरिष्ठ स्तरावर ठोस भूमिका नसल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छूकांनी मोचेर्बांधणीला वेग दिला आहे. त्यातच शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दोन वेळा भेटी देऊन रिसोड मतदारसंघातील राजकीय वातावरण तापविले आहे. युतीत हा मतदारसंघ कुणाला सुटतो आणि उमेदवार कोण राहिल यावर लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे.एकंदरित काँग्रेसचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसल्याने आणि त्यात वंचित आघाडीने वातावरण निर्मिती केल्याने काँग्रेससमोर तगडे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसनेदेखील परंपरागत मतदार टिकवून ठेवण्याबरोबरच अन्य मतदारांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. विरोधकांनी निर्माण केलेल्या या आव्हानांवर मात करण्यासाठी कॉंग्रेसला मतदारांची कितपत साथ मिळते, यावर काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस