व्हिडीओ- वाशिमची वाहतूक झाली ‘सैराट’; पार्किंगचा प्रश्न गंभीर!
By Admin | Updated: September 18, 2016 18:04 IST2016-09-18T18:03:28+5:302016-09-18T18:04:22+5:30
शहर वाहतूक विभागाचे दुर्लक्ष तसेच जिल्हा प्रशासन, नगर परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील वाहतूक अक्षरश: ‘सैराट’

व्हिडीओ- वाशिमची वाहतूक झाली ‘सैराट’; पार्किंगचा प्रश्न गंभीर!
सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत
वाशिम,दि.18- शहर वाहतूक विभागाचे दुर्लक्ष तसेच जिल्हा प्रशासन, नगर परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील वाहतूक अक्षरश: ‘सैराट’ झाली आहे. बोकाळलेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे आणि पार्किंगच्या न सुटणा-या तिढ्यामुळे दैनंदिन अपघातांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
वाशिम जिल्ह्याची निर्मिती १९९८ मध्ये झाली. या घडामोडीला आजमितीस १९ वर्षाचा मोठा काळ लोटला. असे असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरासह जिल्ह्यातील इतर शहरांचा विकास अद्याप साधल्या गेला नाही. वाहतूकीचा प्रश्न अधिकच बिकट झाला असून शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिक मन मानेल त्या पद्धतीने आपली वाहने उभी करत असल्याने वाहनधारक तथा पादचा-यांना मार्गक्रमण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरांतर्गत जडवाहतूकीच्या समस्येमुळेही समस्यांमध्ये भर पडत आहे.
पाहा व्हिडीओ-