VIDEO : खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी

By Admin | Updated: November 18, 2016 17:00 IST2016-11-18T16:59:53+5:302016-11-18T17:00:50+5:30

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 18 - शिरपूर जैन येथील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन ...

VIDEO: Temporary bandage to crush potholes | VIDEO : खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी

VIDEO : खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 18 - शिरपूर जैन येथील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र डांबर न टाकताच रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. 

खड्डे बुजवण्याची ही मोहीम 17 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. तर 18 नोव्हेंबरपासून खड्डे बुजवताना चक्क खड्ड्यांत गिट्टी टाकण्यात येत आहे. यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बांधकाम विभाग मालेगावचे अभियंता नागे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो  पूर्ण होऊ शकला नाही. 
 
 

https://www.dailymotion.com/video/x844ikz

Web Title: VIDEO: Temporary bandage to crush potholes