VIDEO : तहानलेल्या कुटुंबीयांना पाणी देणारा ‘संजय’
By Admin | Updated: April 22, 2017 14:56 IST2017-04-22T14:50:04+5:302017-04-22T14:56:36+5:30
ऑनलाइन लोकमत शिरपूर (वाशिम), दि. 22 - ग्रामपंचायतीच्यावतीने 3 ते 4 दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिकांकडे पाणीसाठा करुन ...

VIDEO : तहानलेल्या कुटुंबीयांना पाणी देणारा ‘संजय’
ऑनलाइन लोकमत
शिरपूर (वाशिम), दि. 22 - ग्रामपंचायतीच्यावतीने 3 ते 4 दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिकांकडे पाणीसाठा करुन ठेवण्यासाठी सोय नसल्याने त्यांना दररोज पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. या पार्श्वभूमीवर गावक-यांना पाण्यासाठी मैलो-न्-मैल पायपीट करावी लागू नये, यासाठी येथील एका तरुणानं पुढाकार घेतला आहे. येथे राहणारा संजय कोठारी हा युवक गेल्या दोन वर्षांपासून मोफतपाणी वाटप करुन नागरिकांची तहान भागवण्याचे काम पार करत आहे.
उन्हाळ्यात सर्वत्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होते. ग्रामपंचायतच्यावतीने गावात ३ ते ४ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो . गोरगरीब जनतेकडे पाणी साठवणुकीसाठी पुरेसं साधन नसल्याने त्यांना अडचणी सामोरं जावे लागते.
ही गैरसोय लक्षात घेता शिरपूर येथील संजय कोठारी यांनी एक मोठी पाण्याची टाकी घेऊन त्याला 5 नळ बसवलेत. ज्याला कोणाला पाणी पाहिजे त्यांनी येथून घेऊन जावं, कोणालाही अटकाव केला जात नसल्याने, ज्या भागात पाणीटंचाई आहे तेथील नागरिक येथे येऊन पाणी घेऊन जातात. या उपक्रमामुळे संजयचे सर्वत्र कौतुक होत आहे.
https://www.dailymotion.com/video/x844w00