VIDEO : शौचालय नसणा-यांच्या घरी बहुरुपी हवालदार घेवून जातोय ‘वॉरंट’
By Admin | Updated: November 3, 2016 15:24 IST2016-11-03T14:43:14+5:302016-11-03T15:24:53+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने गावोगावी जावून शौचालयाबाबत जनजागृती केली जात आहे.

VIDEO : शौचालय नसणा-यांच्या घरी बहुरुपी हवालदार घेवून जातोय ‘वॉरंट’
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ३ - स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने गावोगावी जावून शौचालयाबाबत जनजागृती केली जात आहे. आता गावागावात शौचालय नसणा-यांच्या घरी एक बहुरुपी हवालदार जावून तुमच्या घरी शौचालय नाही तुमच्या नावाचा वारंट आहे असे म्हणून ग्रामस्थांची घाबरगुंडी उडवितांना दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येकाच्या घरी स्वच्छतागृह असावे यासाठी गुडमॉर्निग पथकाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामधीलच ‘बहुरुपी हवालदार’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या बहुरुपी हवालदार गावात फिरत असताना त्याच्या मागे मोठा ग्रामस्थांचा घोळका निर्माण होत आहे.गावातील नागरिकांना घाबरुन दिल्यानंतर पारावर जावून गीतातून बहुरुपी जनजागृती करीत आहे .