Video- रांगोळीतून शहीद सैनिकांना श्रध्दांजली

By Admin | Updated: October 29, 2016 16:00 IST2016-10-29T16:00:25+5:302016-10-29T16:00:25+5:30

शहीद झालेल्या वीर सैनिकांना ‘एक दिप सैनिकांसाठी’ उपक्रमांतर्गंत शिरपूर येथे रांगोळीतून श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.

Video- Monologues to the martyrs from Rangoli | Video- रांगोळीतून शहीद सैनिकांना श्रध्दांजली

Video- रांगोळीतून शहीद सैनिकांना श्रध्दांजली

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन, दि. २९ -  देशाच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या वीर सैनिकांना ‘एक दिप सैनिकांसाठी’ उपक्रमांतर्गंत शिरपूर येथे रांगोळीतून श्रध्दांजली  अर्पित करण्यात आली.
जैन समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणा-या श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान शिरपूर जैन येथे दिपावली निमित्त एक दिप सैनिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारसबागेत आयोजित कार्यक्रमस्थळी अमोल घोडे या युवकाने रांगोळीतून शहिद वीरसैनिकांना श्रध्दांजली अर्पित केली. पारसबागेत भव्य काढण्यात आलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले होते. 
या कार्यक्रमास शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक हरिष गवळी, पोलीस कॉन्स्टेबल पंजाब घुगे,  अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानचे  कार्यकारी अधिकारी दिनेश मुथा, महिला पोलीस अधिकारी राऊत यांच्यासह भाविकांची मोठया प्रमाणात उपस्थिती लाभली होती. यावेळी ठाणेदार गवळी यांनी संस्थानच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतूक केले. तसेच शहिदासांठी असे उपक्रम राबविण्याबाबत मत व्यक्त केले.

Web Title: Video- Monologues to the martyrs from Rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.