VIDEO : उच्चशिक्षित रेखाने केले शेतशिवार हिरवेगार!

By Admin | Updated: October 25, 2016 14:33 IST2016-10-25T14:33:40+5:302016-10-25T14:33:40+5:30

माहेरी लाडात लहानाची मोठी झालेल्या, शिक्षणाच्या वाटेवर शेतीचा ‘श’ देखिल माहित नसलेल्या उच्चशिक्षित महिलेने सासरी मात्र शेतीची धुरा अंगावर घेतली.

VIDEO: Harvested farming done by a highly educated line! | VIDEO : उच्चशिक्षित रेखाने केले शेतशिवार हिरवेगार!

VIDEO : उच्चशिक्षित रेखाने केले शेतशिवार हिरवेगार!

सुनिल काकडे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २५ -   माहेरी लाडात लहानाची मोठी झालेल्या , शिक्षणाच्या वाटेवर शेतीचा ‘श’ देखिल माहित नसलेल्या रेखा पुरुषोत्तम गोरे या उच्चशिक्षित महिलेने सासरी मात्र शेतीची धुरा अंगावर घेतली. एवढेच नव्हे तर प्रखर जिद्द आणि उत्तुंग आत्मविश्वासाच्या बळावर शेतशिवार हिरवेगार करण्याची किमया करुन दाखविली.
रेखा यांचे पती पुरुषोत्त गोरे हे ज्ञानदानाचे कार्य करतात. त्यामुळे शेतीची संपूर्ण जबाबदारी रेखा यांनी आपल्या खाद्यांवर पेलली आहे. ७ एकर शेतीत हळद, तूर, उडीद, सोयाबीन, कोथींबीर, मिर्ची ही पिके त्या घेतात. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालनाची कास धरली आहे.
 
  

Web Title: VIDEO: Harvested farming done by a highly educated line!