VIDEO : गॅस सिलिंडरच्या छिद्रात अडकला साप!
By Admin | Updated: November 2, 2016 15:31 IST2016-11-02T15:31:47+5:302016-11-02T15:31:47+5:30
घरगुती गॅस सिलिंडरच्या बुडाशी असलेल्या छिद्रात साप अडकल्याने वाशिममध्ये एकच खळबळ उडाली

VIDEO : गॅस सिलिंडरच्या छिद्रात अडकला साप!
ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड ( वाशिम), दि. २ - घरगुती गॅस सिलिंडरच्या बुडाशी असलेल्या छिद्रात साप अडकल्याने वाशिममध्ये एकच खळबळ उडाली. तब्बल तीन तासांच्या महतप्रयासानंतर त्याला बाहेर काढण्यात सर्पमित्राला यश मिळाले.
भुगर्भात उष्णता असल्याने व वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मानव वस्तीत सापाचे वास्तत्व वाढले आहे. कांरजा येथील रमाई परीसरात घरातील सिंलेडरच्या खाली अचानक साप दिसल्याने गृहीणीच्या हदयाचे ठोके वाढले व तिने जीवाच्या आकांताने घरातून पळ काढला.
रमाई परीसरातील उज्वला गोडबोले हया घरकाम करत असतांना अचानक सिंलेंडरच्या खालून सापाच्या फुत्कारण्याचा आवाज आला. सदर आवाज सापाचा आहे हे लक्षात आल्याने आपली चिमुकली झोपली असतांना त्यांनी तिला झोपेतून उठवून घरातून बाहेर पळ काढला. भितीपोटी आरडाओरड केल्याने परीसरातील इतर नागरीकही त्या ठिकाणी गोळा झाले. त्यानंतर सर्प मित्राला प्राचारण केले. सदर साप हा सिंलेडरच्या खालच्या बाजूच्या एक छिद्रामध्ये अर्धा अधिक अडकल्याने सापाला बाहेर निघता येत नव्हते. बाहेर काढण्यासाठी सर्पमित्राने सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न केले. परंतू साप निघाला नाही. अखेर सिंलेडरसहीत सापाला वन पर्यटन केंद्रात नेण्यात आले. तेथे वनमजूर गजानन थेर यांच्या प्रयत्नाने सिलिंडरच्या छिद्रात अडकलेल्या सापाला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.