VIDEO : डवरणीसाठी बैलाच्या जागी शेतकरी!
By Admin | Updated: August 10, 2016 17:23 IST2016-08-10T17:23:37+5:302016-08-10T17:23:37+5:30
पावसाने उघडीप दिल्याने शेतकºयांनी डवरणीच्या कामांना मोठया प्रमाणात सुरुवात केली. पाऊस असल्यास शेतात डवरणी दिल्या जात नसल्याने शेतकरी डवरणीच्या कामात व्यस्त

VIDEO : डवरणीसाठी बैलाच्या जागी शेतकरी!
>ऑनलाइन लोकमत
देपूळ, दि. 10 - पावसाने उघडीप दिल्याने शेतक-यांनी डवरणीच्या कामांना मोठया प्रमाणात सुरुवात केली. पाऊस असल्यास शेतात डवरणी दिल्या जात नसल्याने शेतकरी डवरणीच्या कामात व्यस्त आहे. देपूळ येथे ९ आॅगस्ट रोजी एका शेतक-याने शेतात डवरणीचे काम सुरु केले असता मधातचं बैल आजारी पडला व तो जागेवरचं बसला. अशावेळी काय करावे या चिंतेत असतांनाच चक्क शेतक-याने ‘जू’ आपल्या खांदयांवर घेवून डवरणी पूर्ण केली.
वाशिम तालुक्यातील देपूळ येथील शेतकरी संजय गंगावणे यांनी ९ आॅगस्ट रोजी शेतातील डवरणीच्या कामास सकाळपासून सुरुवात केली. डवरणीचे काम पूर्णत्वाकडे असतांनाच शेतातील दोन ओळी (१० ते १५ गुंठे शेत) डवरणी राहली असताना बैल आजारी पडला व जागेवरचं बसला. शेतकºयामध्ये चिंता निर्माण झाली की, एवढया कामासाठी कोणाचा बैल आणावा, कोणाचा बैल सुध्दा रिकामा नसल्याने अखेर स्वताच्या खादयांवर ‘जू’ जुतून उरलेल्या शेताची डवरणी पूर्ण केली. कामावर असलेल्या संतोष मापारी व ठोंबरे यांनी डवरे हाणण्याचे काम केले. संकटसमयी शेतक-यांना अनेक अडचणींच्या सामोरे जावे लागत असून अशाही समयी तो थांबत नसल्याचे या शेतकºयाच्या कार्यावरुन दिसून येते.