VIDEO : वाशिममध्ये कला पथकाने सादर केला 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रम
By Admin | Updated: October 22, 2016 14:40 IST2016-10-22T14:26:05+5:302016-10-22T14:40:59+5:30
नाटय दर्पण कला मंच अमरावतीचे कलाकारांच्या वतीने वाशिममध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम सादर करण्यात आला.

VIDEO : वाशिममध्ये कला पथकाने सादर केला 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रम
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २२ - नाटय दर्पण कला मंच अमरावतीचे कलाकारांच्या वतीने जिल्हयात ' बेटी बचाओ बेटी पढाओ बाबत कलापथकातून जनजागृती करण्यात येत आहे . वाशिम पंचायत समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे . शहरातील मुख्य चौकात उभे राहून या कलापथकातील कलाकार प्रदर्शन करीत असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहेत. सदर कलाकार कलापथकातून बेटी बचाओ बेटी पढाओ सह गर्भपात करु नका, स्त्रीभ्रूण हत्त्या करू नका, मुलगा -मुलगी एक समान , आम्ही गोंधळी -गोंधळी जनसेवेचे गोंधळी गीतातून व अभिनयातून जनजागृती करीत आहेत . २२ ऑक्टोंबरपर्यंत या पथकाने वाशिम शहरासह काटा, वांगी या गावात ही कार्यक्रम घेतले . या कलापथकात प्रविण वानखेडे, राजा वेणी, मालती मेश्राम, सहयोनी मिश्रा , निरज माईकल, रविंद्र गुजर, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अनिल हरडे यांचा समावेश आहे .