वाशिम येथे फडकविला विदर्भ राज्याचा झेंडा!
By Admin | Updated: May 2, 2016 01:51 IST2016-05-02T01:51:11+5:302016-05-02T01:51:11+5:30
जनमंच व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन.

वाशिम येथे फडकविला विदर्भ राज्याचा झेंडा!
वाशिम : महाराष्ट्र दिनाचा निषेध करून जनमंच व विदर्भ राज्य आंदोलन समितीने वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विदर्भ राज्याचा झेंडा फडकविला. महाराष्ट्रदिनी संपूर्ण विदर्भात विदर्भवादी संघटनांतर्फे विदर्भाचा झेंडा फडकवित काळा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने वाशिममध्येसुद्धा स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती व जनमंच यांनी १ मे हा काळा दिवस पाळला. अखंड महाराष्ट्राचा विरोध करून विदर्भवादी संघटनांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविला. जनमंचचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष पवन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपाच्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली. काळे झेंडे दाखवून महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यात आला.