पशुवैद्यकीय केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात
By Admin | Updated: July 13, 2014 22:42 IST2014-07-13T22:42:02+5:302014-07-13T22:42:02+5:30
शिरपूरजैन येथील पशुवैद्यकीय केंद्राला पुर्णता अतिक्रमणाने ग्रासले आहे.

पशुवैद्यकीय केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात
शिरपूरजैन : येथील पशुवैद्यकीय केंद्राला पुर्णता अतिक्रमणाने ग्रासले आहे. खराब रस्ता व औषधीच्या तुटवडयाने येथील समस्यांमध्ये अधिकाच भर पडली आहे.
शिरपूर येथील पशुवैद्यकीय केंद्रासमोर मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पुर्वी दूरपासून दिसणारे पशु वैद्यकीय केंद्र सद्य:स्थितीत कोठे आहे हे शोधण्याची वेळ शिरपूर येथील पशुपालकांवर आली आहे. त्यातच एका पशुवैद्यकीय अधिकार्याच्या दिमतीला केवळ दोनच परिचर असल्याने केंद्राअंतर्गत येणार्या एकांबा, मणका, किन्ही घोडमोड, मिर्झापुर, घाटा, पांगरखेडा, गौळखेडा, दुधाळा, वसारी, तिवळी, शेलगाव, व शिरपूर या १२ गावातील १0 ते १२ हजार पशुधनाची निगा राखण्याची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्यात अडचणी येत आहेत. औषधीचा सतत तुडवडा असल्याने पशुपालकांना दुकानवरुन मोठया प्रमाणात औषधी खरेदी करावी लागत आहे.