अंगणवाडीतील ‘पोषण आहार’ची पडताळणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST2021-08-22T04:43:45+5:302021-08-22T04:43:45+5:30
कोरोनामुळे अंगणवाडी केंद्र बंद आहेत; मात्र पात्र बालके, स्तनदा माता आदी लाभार्थींना पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. संबंधित ...

अंगणवाडीतील ‘पोषण आहार’ची पडताळणी!
कोरोनामुळे अंगणवाडी केंद्र बंद आहेत; मात्र पात्र बालके, स्तनदा माता आदी लाभार्थींना पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. संबंधित लाभार्थींना नियमानुसार पोषण आहार मिळतो की नाही, तेथे कोरोनाविषयक नियमाचे पालन होत आहे की नाही याची पडताळणी म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी गवळी यांनी वाशिम तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेट देण्याची मोहीम हाती घेतली. पंंचाळा येथे मागील आहार वाटपादरम्यान गर्दी आणि गोंधळ उडाला होता. ही परिस्थिती या महिन्यात निर्माण होऊ नये म्हणून तेथे भेट देऊन पाहणी केली. पोषण आहार वाटपात कुणी कुचराई करीत असेल तर संबंधितांची गय केली जाणार नाही, अशा इशाराही गवळी यांनी दिला.
---------
नियमानुसार पोषण आहार वाटप करा
कोरोनाकाळात प्रत्येक पात्र लाभार्थींना शासनाकडून मिळणारा पोषण आहार नियमानुसार वाटप होणे अपेक्षित आहे. पोषण आहार वाटपादरम्यान कुठेही गर्दी, गोंधळ उडू नये तसेच नियमानुसार जेवढे धान्य आले, तेवढे धान्य पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचवा, अशा सूचना प्रियंका गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.