अकरावी प्रवेशप्रक्रियेची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:44 IST2021-01-13T05:44:43+5:302021-01-13T05:44:43+5:30

शिक्षण विभागाकडून येत्या दि. १२ जानेवारी ते दि. २३ जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील ११वी प्रवेशाची पडताळणी ...

Verification of the Eleventh Admission Process | अकरावी प्रवेशप्रक्रियेची पडताळणी

अकरावी प्रवेशप्रक्रियेची पडताळणी

शिक्षण विभागाकडून येत्या दि. १२ जानेवारी ते दि. २३ जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील ११वी प्रवेशाची पडताळणी केली जाणार आहे. त्यात दि. १२ जानेवारी रोजी मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील ११वी प्रवेशाची पडताळणी शिवाजी विद्यालय वाशिम येथे दि. १९ जानेवारी रोजी रिसोड तालुक्यातील प्रवेशाची पडताळणी भारत माध्यमिक विद्यालय रिसोड येथे दि. २२ जानेवारी रोजी वाशिम तालुक्यातील प्रवेशाची पडताळणी शिवाजी विद्यालय वाशिम येथे, तर कारंजा व मानोरा तालुक्यातील प्रवेशाची पडताळणी विद्याभारती महाविद्यालय कारंजा लाड येथे होणार आहे. ज्या शाळेत पडताळणी आयोजित केली आहे. त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी पडताळणीच्या दिवशी बैठक व्यवस्था, पाणी व्यवस्था, सॅनिटायझर इतर आवश्यक व्यवस्था करावी, अशा सूचनाही जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: Verification of the Eleventh Admission Process