‘नो पार्किंग झोन’मध्ये उभी राहताहेत वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST2021-09-26T04:45:02+5:302021-09-26T04:45:02+5:30

रिसोड : बसस्थानकापासून २०० मीटरचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित झालेला आहे. असे असताना नियमांची पायमल्ली होत असून, ...

Vehicles are parked in the 'No Parking Zone' | ‘नो पार्किंग झोन’मध्ये उभी राहताहेत वाहने

‘नो पार्किंग झोन’मध्ये उभी राहताहेत वाहने

रिसोड : बसस्थानकापासून २०० मीटरचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित झालेला आहे. असे असताना नियमांची पायमल्ली होत असून, खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने २०० मीटर परिसरातच उभी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

परिसरात खासगी वाहनधारकांनी वाहने थेट स्थानकाच्या गेटवर लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गंभीर बाब म्हणजे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने दररोज सकाळी बसस्थानकात जाऊन प्रवाशांची पळवापळवी करत असल्याचा प्रकार घडत आहे. एसटी महामंडळ आधीच या ना त्या प्रकारे तोट्यात असून, खासगी वाहनांकडून अवलंबिण्यात आलेल्या चुकीच्या प्रकारामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.

...............

कोट :

खासगी वाहनधारकांनी त्यांची वाहने ‘नो पार्किंग झोन’मध्ये उभी न करण्यासंबंधी नियोजन करावे, याबाबत अनेकवेळा रिसोड पोलीस स्टेशन तसेच वाशिम आरटीओ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्याप या प्रश्नावर प्रभावी तोडगा निघालेला नाही.

- श्रीकांत जगताप, आगार व्यवस्थापक, रिसोड

Web Title: Vehicles are parked in the 'No Parking Zone'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.