परिवहन कार्यालयात वाहन ०.४ प्रणाली कार्यान्वित!
By Admin | Updated: April 13, 2017 20:28 IST2017-04-13T20:28:15+5:302017-04-13T20:28:15+5:30
वाशिम- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी, हस्तांतरण, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र आदी कामांकरिता ११ एप्रिलपासून वाहन ४.० प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

परिवहन कार्यालयात वाहन ०.४ प्रणाली कार्यान्वित!
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी, हस्तांतरण, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र आदी कामांकरिता ११ एप्रिलपासून वाहन ४.० प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
या नव्या तथा अत्याधुनिक प्रणालीच्या माध्यमातूनच यापुढे सर्व कामे केली जातील. यासंबंधिची विस्तृत माहिती ह्यपरिवहन डॉट जीओव्ही डॉट इनह्ण या वेबसाईटवर असून वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.