वाहन नोंदणीतून कोट्यवधींची अवैध उलाढाल!

By Admin | Updated: April 11, 2016 01:23 IST2016-04-11T01:23:38+5:302016-04-11T01:23:38+5:30

शोरूममध्येच आकारली जाते अवास्तव रक्कम : ‘लोकमत स्टिंग’ने केला पर्दाफाश.

Vehicle registration illegal billions of crores! | वाहन नोंदणीतून कोट्यवधींची अवैध उलाढाल!

वाहन नोंदणीतून कोट्यवधींची अवैध उलाढाल!

संतोष वानखडे / शिखरचंद बागरेचा / वाशिम
वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन), बंधनकारक केलेली अँक्सेसरीज्ची खरेदी, एक्सटेंडेड वॉरंटी आदींच्या नावाखाली वाशिम जिल्ह्यातील काही शोरूममध्ये ग्राहकांची खुलेआमपणे कशी लूट केली जाते, याचा पर्दाफाश लोकमतने स्टिंग ऑपरेशनमधून केला. या धंद्यात कोट्यवधींची उलाढाल होत असून, ग्राहकवर्ग फसला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
वाशिम शहरासह जिल्हाभरात दुचाकी, चारचाकी वाहने, तीन चाकी ऑटो, मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर व अन्य प्रकारच्या वाहनांची विक्री करण्यासाठी जवळपास २0 ते २५ अधिकृत वितरक आहेत. शासकीय नियमांच्या अधीन राहून या वितरकांनी वाहनांची विक्री करणे अपेक्षीत आहे. वाहनांची एक्सशोरूम किंमत, कंपनीकडून मिळणार्‍या सुविधा किंवा सूट, आरटीओंचे अधिकृत नोंदणी शुल्क, टॅक्स, अँक्सेसरीज् आदींबाबत वाशिम शहरासह जिल्ह्यातील काही शोरूममध्ये ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याची माहिती ह्यलोकमतह्ण प्रतिनिधींना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी शहरातील काही शोरूमंमध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. अकोला रोड ते पुसद नाक्यापर्यंतच्या काही ट्रॅक्टर शोरूममध्ये कोटेशन, ट्रॅक्टरची एक्सशोरूम किंमत, रजिस्ट्रेशन व ह्यअँक्सेसरीज्ह्ण याबाबत स्टिंग केले असता, धक्कादायक बाबी समोर आल्या. एक्सशोरूम किंमतीव्यतिरिक्त ज्ॉक, टुल किट, स्टेफणी यासह अन्य साहित्य (अँक्सेसरीज) घेणे बंधनकारक असून, यासाठी १८ ते २४ हजार रुपये आकारले जातील तसेच आरटीओ पासिंग व इन्शूरन्सचे १५ ते १७ हजार रुपये द्यावे लागतील, असे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगण्यात आले. आमच्याकडे शेतीचा सातबारा असल्याने ट्रॅक्टर रजिस्ट्रेशनसाठी किती रुपये लागतील, अशी विचारणा केली असता, साधारणत: ३ ते ४ हजार रुपये लागतात, असे उत्तर मिळाले. येथेही रजिस्ट्रेशनच्या नावाखाली लुट होत असल्याचे दिसून येते.
चारचाकी कार, जीप आदी वाहनांबाबत अकोला रोड ते हिंगोली रेल्वे गेटपर्यंतच्या काही शोरूममध्ये विचारणा केली असता, वाहन रजिस्ट्रेशनसाठी ५५0 रुपये, ह्यइन्शूरन्सह्ण काढल्यानंतरही ह्यएक्सटेंडेड वॉरंटीह्णच्या नावाखाली वाहनाच्या किंमतीनुसार ७ ते १६ हजार रुपये आणि १0 ते २0 हजारापर्यंतची अँक्सेसरीज बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. मोटारसायकलच्या काही शोरूममध्ये विचारणा केली असता, ५५0 रुपये वाहन रजिस्ट्रेशन, वाहनाच्या किंमतीनुसार एक हजार ते १७00 रुपयापर्यंत अँक्सेसरीज घेणे बंधनकारक असल्याची माहिती मिळाली. तसा उल्लेखही कोटेशनमध्ये केला जातो. शासकीय नियमानुसार दुचाकी वाहन नोंदणीची सर्व कार्यवाही २१0 रुपयांमध्ये होत असताना, ५५0 रुपये कोणत्या आधारावर आकारले जातात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकही अधिकृत एजंट नसल्याने अतिरिक्त आकारण्यात येणार्‍या ३४0 रुपयांचा गल्ला वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करून देत आहे.

Web Title: Vehicle registration illegal billions of crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.