शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरती प्रक्रियेवर 'एसीबी'चा वॉच! पैशाची मागणी महागात पडणार

By संतोष वानखडे | Updated: June 20, 2024 19:36 IST

नोकरीच्या नावाखाली पैशाची मागणी करणाऱ्यांवर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क झाला आहे.

वाशिम : राज्यातील पोलिस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, नोकरीच्या नावाखाली पैशाची मागणी करणाऱ्यांवर कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी ) सतर्क झाला आहे. 

राज्यातील रिक्त असलेल्या  पोलिस शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बँडस्मन, सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती- २०२३ करीता देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक व निःपक्षपाती होण्याकरिता मैदानावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक उमेदवारांची व्हीडीओ शुटींग तसेच उमेदवारांची ओळख आधार व्हेरिफिकेशन व्दारे देखील घेण्यात येणार आहे. असे असले तरी काही लोकसेवक किंवा त्यांचे खासगी पंटर हे पोलिसाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून पैशाची मागणी करू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक होऊ नये तसेच पैशाची मागणी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क झाला आहे.पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान लोकसेवकाने अथवा त्यांच्यावतीने कोणत्याही अन्य व्यक्तिने पोलिस भरतीसंदर्भात आमिष, प्रलोभन देवून पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबी अमरावती परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप यांनी केले.

तक्रार कोठे करावी ?

पोलिस भरती संदर्भात नोकरीचे आमिष देवून कोणी पैशाची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. याशिवाय संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करता येणार आहे.

वाशिम जिल्ह्यात ६८ जागांसाठी ४२७९ अर्ज !

वाशिम पोलिस दलातील ६८ जागांसाठी ४ हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये पुरुष ३७६० आणि ५१९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

लोकसेवक अथवा त्यांच्यावतीने अन्य व्यक्तिने पोलिस भरती संबंधाने प्रलोभन अथवा आमिष देवून पैशाची किंवा इतर काही मोबदल्याची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे किंवा टोल फ्री क्रमांकावर निसंकोच संपर्क साधावा - गजानन शेळके, पोलीस उपअधीक्षक एसीबी वाशिम

टॅग्स :Policeपोलिस