कारंजा बाजार समितीला विभागस्तरीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:45 PM2018-09-28T14:45:51+5:302018-09-28T14:46:12+5:30

कारंजा लाड (वाशिम): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला अमरावती विभागातील उत्कृष्ट बाजार समिती म्हणून प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Vasantdada Patil Smriti Award given to Karanja APMC | कारंजा बाजार समितीला विभागस्तरीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार 

कारंजा बाजार समितीला विभागस्तरीय वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
कारंजा लाड (वाशिम): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला अमरावती विभागातील उत्कृष्ट बाजार समिती म्हणून प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण २७ सप्टेंबर रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. राज्याचे पणन संचालक दिपक तावरे यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. 
पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला पणन संघ अध्यक्ष दिलीपराव मोहिते पाटील, पणन मंडळ कार्यकारी संचालक, दिपक पवार, यांचेसह सर्व संचालकांची उपस्थिती होती. शेतकºयांच्या हिताच्या सर्व योजना राबविण्यासह शेतकºयांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, पारदर्शकपणा, स्वच्छता  आदिंबाबीसाठी कारंजा बाजार समिती अमरावती विभागातून उत्कृष्ट बाजार समिती म्हणून प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन बाजार समितीचा गौरव करण्यात आला. बाजार समितीचे उपसभापती डॉ. अशोक मुंदे, संचालक प्रमोद कडू, वसंतराव लेहारकर, पंजाबराव ठाकरे, दिपक पापडे व सहा.सचिव किशोर शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या आधी सन २०१७ -१८ मध्ये कारंजा बाजार समितीला शेतमाल तारण योजनेंतर्गत राज्याच्या १०० बाजार समित्यांमधून चतुर्थ पुरस्कार मिळाला आहे. कारंजा बाजार समिती सर्व संचालक मंडळ सचिव निलेश भाकरे व कर्मचाºयांच्या समन्वयातून बाजार समिती शेतकºयांचे हित जोपासून कार्य करीत आहे आणि यापुढेही विविध योजना व उपक्रम राबविण्याचा प्रयत्न बाजार समिती करू, असे बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके यांनी सांगितले.

Web Title: Vasantdada Patil Smriti Award given to Karanja APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.