बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:40 AM2021-01-25T04:40:39+5:302021-01-25T04:40:39+5:30

००००० केनवड येथे पालक-शिक्षकांची बैठक केनवड : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ...

Various programs on the occasion of Girls' Day | बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम

बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Next

०००००

केनवड येथे पालक-शिक्षकांची बैठक

केनवड : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शनिवारी शिक्षक, पालकांची बैठक पार पडली. कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी व्हावी, पालकांचे संमतिपत्र, बैठक व्यवस्था आदीवर चर्चा झाली.

००००

संरक्षण क्षमता महोत्सवात सहभागी व्हा !

वाशिम : पेट्रोलियम इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, इंधन बचत आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण क्षमता महोत्सव राबविण्यात येत आहे. या महोत्सवात नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक मनीष बोबडे यांनी २२ जानेवारी रोजी वाशिम येथे केले.

००००

तूर उत्पादक शेतकरी अडचणीत

रिठद : यंदा विविध कारणांमुळे तुरीच्या एकरी उत्पादनात घट येत आहे. रिठद परिसरातील अनेक शेतकऱ्यांना एकरी एक ते तीन क्विंटलदरम्यान उतार आला आहे. शासनाने तूर उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी नारायणराव आरू यांनी दि. २३ जानेवारी रोजी केली.

Web Title: Various programs on the occasion of Girls' Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.