ईदनिमित्त विविध कार्यक्रम
By Admin | Updated: December 25, 2015 03:01 IST2015-12-25T03:01:41+5:302015-12-25T03:01:41+5:30
वाशिम येथे शोभायात्रा; शोभायात्रेचे भावपूर्ण स्वागत.

ईदनिमित्त विविध कार्यक्रम
वाशिम: ईदनिमित्त वाशिम शहरासह जिल्हाभरात २४ डिसेंबर रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. वाशिम येथे शोभायात्रेची सुरुवात स्थानिक नगीना मशीद येथून झाली. सर्वप्रथम सर्व मशीदच्या ईमामांचे पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. बालू चौक, शिवाजी चौक, पाटणी चौक, रिसोड नाका, नालसापुरा, बुराकपुरा, गुरुवार बाजार, सौदागरपुरा, नगर परिषद चौक, दंडे चौक, बागवान पुरा, लालमिया दर्गा, धृव चौक, राजणी चौक येथून शोभायात्रा नबी साहब मशीद येथे आली. येथे शोभायात्रेची समाप्ती झाली. हाफीज जमीर व हाफीज शमीम अख्तर यांनी प्रार्थना केली. शोभायात्रेच्या समारोप प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी भेट देऊन सर्व समाज बांधवांना ईद मुबारक शुभेच्छा दिल्या. सर्व समाजबांधवांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर शोभायात्रेचे व्यापारी संघटना व शहरात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये हाफीज इद्रीस, हाफीज युसूफ, हाफीज रियाजूल हसन, मौलाना फकरुद्दीन, खैरुद्दीन मुल्लाजी, प्रा. मिर्झा अबरार बेग यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा काढण्यात आली.