आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:19+5:302021-04-06T04:40:19+5:30
00000000 रस्ता दुभाजकांमधील वृक्ष कोमेजले वाशिम : रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी दुभाजक टाकण्यात आले आहेत. त्यात ...

आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित
00000000
रस्ता दुभाजकांमधील वृक्ष कोमेजले
वाशिम : रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी दुभाजक टाकण्यात आले आहेत. त्यात लावलेले वृक्ष मात्र पाणी मिळत नसल्याने व योग्य देखभालअभावी कोमेजून गेल्याचे चित्र वाशिम-रिसोड मार्गावर दिसून येत आहे.
0000000000000
वाढीव दर कमी करण्याची मागणी
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलासह अन्य स्वरूपातील किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडल्याचा सूर उमटत आहे. दरम्यान, वाढीव दर कमी करण्याची मागणी शिरपूर येथील उषा जाधव यांनी प्रशासनाकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे.
0000000000000000
वायू प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : रिठदमार्गे वाशिम-रिसोड मार्गावरून धावणारी प्रवासी वाहने, ऑटोंपैकी अनेक वाहने भंगार झालेली आहेत. या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे वायू प्रदूषण होत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
000000000000
जलस्रोतांच्या पातळीत झपाट्याने घट
मेडशी : गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन तापत आहे. यामुळे बाष्पीभवन होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने सिंचन तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. दुसरीकडे जलस्त्रोतांची पातळीही खालावल्याने पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत आहेत.
000000000000
वाशिम येथे सापाला जीवदान
वाशिम : येथील सर्पमित्र मो. समीर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवार, ४ एप्रिल रोजी लाखाळा परिसरात साप आढळल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी हजर होऊन तासभराच्या प्रयत्नानंतर सापाला ताब्यात घेऊन एकबुर्जी प्रकल्पानजीक सुरक्षितस्थळी नेऊन सोडून दिले.
0000000000
05wh01
मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा
मालेगाव : मालेगाव ते अकोला या प्रमुख रस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्यावर ठिय्या मांडून बसत आहेत. यामुळे दिवसभरातून अनेकवेळा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. स्थानिक नगरपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
00000000000
गुड माॅर्निंग पथक जिल्ह्यात सक्रिय
वाशिम : ग्रामीण भागात शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र, अधिकांश ठिकाणी त्याचा वापरच केला जात नाही. बहुतांश नागरिक आजही उघड्यावरच शाैचास जात आहेत. अशा लोकांवर कारवाईसाठी गुड माॅर्निंग पथक जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाले आहे.
00000000000
वाशिम शहरातील वाहतूक प्रभावित
वाशिम : शहरातील पाटणी चाैक ते शिवाजी चाैक यादरम्यानच्या रस्त्यावर सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वाहतूक प्रभावित झाली होती. रस्त्यालगत वाहने उभी केली जात असल्याने हा प्रकार नित्याचाच झाला आहे.
0000000000
मोरगव्हाणवाडी पाणंद रस्त्याची दुरवस्था
रिसाेड : येथून जवळच असलेल्या मोरगव्हाणवाडी पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी १० ते १५ मीटर अंतराचे खड्डे पडले असून, गेल्या १७ वर्षांत एकदाही या रस्त्याची साधी डागडुजी करण्यात आलेली नाही.
0000000000
वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्याची मागणी
रिसाेड : येथील महावितरण कार्यालयांतर्गत येत असलेल्या रहाटी फिडरवरील कृषीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
000000000000
उमरदरी येथे कोरोना लसीकरण
किन्हीराजा : येथून जवळच असलेल्या उमरदरी येथे ३ एप्रिल रोजी ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. या मोहिमेस गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.